BLOG ADDA

Sunday, December 19, 2010

पवना धरणक्षेत्र : एक आल्हाददायी अनुभ


कधी कधी तडका फडकी बनवलेले plans अगदी व्यवस्थित पार पडतात. काल हि तसेच झाले. माझी एक मैत्रीण आणि २ मित्र आम्ही मिळून पुण्याच्या आसपास कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत आखला. फिरायला जागा बऱ्याच होत्या पण त्यापैकी एकही finalहोत नव्हती. त्या २ मित्रांपैकी एकाकडे चारचाकी वाहन असल्यामुळे फार काही त्रास होणार नव्हता प्रवासाचा. निदानसुरुवातीला बनलेल्या प्लान प्रमाणे दुचाकी वर जाऊन जितका त्रास झाला असतात तितका त्रास तर नक्कीच होणार नव्हता. आणि शिवाय गाडीत मागच्या सीट वर बसून गाणी ऐकण्यात जी मज्जा आहे ती केवळ अप्रतिम! "गाडीवान" मित्र आणि आमची मैत्रीणपुणे शहरातून औंध ला आम्हाला भेटून मग आम्ही चौघे सोबत निघणार होतो. भारतीय वेळेनुसार २ वाजता औंध मध्ये भेटायचे ठरले होते,जे अर्थातच २०-२५ मिनिटे उशीर होऊन शेवटी त्यांची गाडी २.२५ पर्यंत औंध मध्ये आली. मी गाडीत बसलेपण आमच्यातल्या एकाचा हट्ट होताकि त्याला दुचाकीवरच यायचे आहे असा. निरनिराळी कारणेजसे कि पाऊस असेलउगीच त्रास होईलसोबत गाणी ऐकता येतील इ.देऊन आम्ही त्याला कसे बसे राजी करून गाडीत घेतले. आता एक मोठा प्रश्न होता! जायचे कुठे! २-३ जागा आधीच cancel करून झाल्यानेशेवटी लोणावळ्या नजीकचे "पवना धरण" पहायचे ठरले.

बाहेर थोडी उन थोडी सावली असा एकंदर प्रकार चालू असतानाअचानक पावसाची सर आली. आम्हाला आधी वाटले कि पुण्यातल्या पावसाला तसेही जास्त वेळ बरसता येत नाहीत्यामुळे थोडा भिजवून पाउस गायब होईल. पण आश्चर्य असे किहा पाउस काही २-३ सरीमध्ये संपणारा नव्हता. तो चांगलाच बरसात राहिलाअगदी पुढच्या २४ तासांसाठी. आम्ही पवना धरणाला जाण्यासाठी जुन्या पुणे मुंबई मार्गावर प्रस्थान केले. तिथून पहिल्या जकात नाक्यानंतर थेट पवनानगरला जाण्यासाठी एक फाटा आहे. त्या रस्त्यावरून जाताना आजू बाजूची हिरवळ पाहून डोळे अगदी दिपून गेले. उंच उंच डोंगर आणि नुकत्याच उगवलेल्या गवताने डोंगरावर पसरलेले हिरवे गालिचे.. आ हा हा. काय रमणीय दृश्य होते ते! बाहेर पाहता पाहता आमच्या पाहण्यात असाच एक डोंगर आला. लांबीला अगदी बराच असलेल्या त्या डोंगरावर समोरच्या दिशेला अंदाजे ९-१० धबधबे वाहताना दिसत होते. काही डोंगरावरची माती स्वतःबरोबर आणून जमिनीला देत होतेतर काही स्वच्छ शुभ्र पाणी आणून धरणीला न्हाऊ घालत होते. ते अति सुंदर दृश्य cameratबंद करताना मात्र माझी बरीच तारांबळ उडाली होती. त्यातल्याच एका डोंगरावर आता आमची गाडी चढू लागली होती. घाटच तोएखादा धबधब्याची देणगी दिल्याशिवाय प्रवास कसा पूर्ण होऊ देईल! एक अतिशय बारीक धारेचा धबधबा पाहून आम्ही गाडी थांबवली आणि बाहेर पडून पावसाचे थेंब अंगावर घेत फोटो काढू लागलो. तिथेच धबधब्याच्या बाजूला ३ गायी चरण्यासाठी आल्या होत्या. एवढ्या तीक्ष्ण उताराच्या त्या डोंगरावर पाय रोवून कशा बरे उभ्या असतील त्या याच विचारात मी पडले! संदर सुंदर फोटो काढून आम्ही तिथून निघालोते थेट पवना धरणाच्या घाटाकडे जायला. धरणाकडे जाणाऱ्या त्या रस्त्यावर सुरुवातीलाच संपूर्ण धरणाचे दूरवरून एक नजर दर्शन घेतले. पुढे गेल्यावर एक खूप उंच धबधबा आणि त्याबाजूला जिथे तिथे पसरलेली बरीच माणसे दिसली. आम्ही थोड्या अंतरावर गाडी लावूनतिथून दिसणाऱ्या धरणाचे फोटो काढण्यात पुन्हा एकदा मग्न झालो. सुंदर सुंदर तेरड्याची आणि काही रानटी सफेद फुले यांचे काही छान छान फोटो घेतले. अर्थातचधबधब्याचा फोटो घेण्यास आम्ही विसरलो नाही. इतक्या गर्दीमुळे त्या धबधब्याचा आस्वाद घेता नाही आलायाची खंत मनाला होती.पण त्याकडे फारसे लक्ष न देता आम्ही पुढे निघालो. आणि पुढे काही मीटर च्या अंतरावरच आम्हाला एक अतिशय सुंदर धबधबा दिसलाआणि महत्वाच म्हणजेतिथे साध चिटपाखरूदेखील नव्हते. आकाशातून अक्षरशः कोसळणारा पाऊस आणि समोर धबधबाअजून काय अपेक्षा असणार आमची! धबधब्याचा पाण्यापासून बनलेल्या त्या लहानश्या ओहोळात पाय टाकत आम्ही त्याच्या नजीक पोहोचलो. जितके आम्ही त्याचा पाण्याच्या वर्षावाच्या जवळ जात होतोतितका तो अधिकाधिक सुंदर भासत होता. उंचावरून येताना त्या पाण्याच्या प्रवाहाने बर्याच ठिकाणी आपले ठसे उमटवले होते. बरेच से दगड माती वाहून गेल्यामुळे आणि सततच्या पाण्याच्या आघातामुळे गुळगुळीत झाले होते. डोंगरावरून येणारे ते पाणी नागमोडी वळण घेत एखाद्या लहान मुलाप्रमाणे या दगडावरून त्या दगडावर उड्या घेत खाली उतरत होते. खेळून खेळून दमल्याने मधेच बसल्याप्रमाणे साचून राहत होते. आणि अगदी शेवटी स्वतःला त्या ओहोळामध्ये विलीन करत होते. तिथे अंदाजे अर्धा तास पाण्याची मजा लुटून आम्ही बाहेर पडलो व लोणावळ्याच्या दिशेने गाडी जाऊ लागली. तिथे थोडीशी पोटाची भूक भागवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

पावसाची कृपा अगदी सुरुवाती पासून शेवट पर्यंत इतकी झाली होती किआमच्या मित्राचा दुचाकी न आणण्याचा निर्णय त्याला अगदी मनोमन पटला! या सगळ्यात खरोखरच प्रशंसायुक्त आभार हे आमच्या गाडीवान मित्राचे मानायला हवेत. इतक्या जोरदार पावसात देखील स्वताच्या driving skills इतक्या छान दाखवल्या त्यानेकि जेव्हा मला आणि माझ्या मैत्रिणीला गाडीत बसून समोरच काही दिसत नव्हताअशा पावसात त्याने अगदी कुशल रित्या गाडी चालवली! एकंदर आमची हि अचानक ठरलेली पण अगदी व्यवस्थित पार पडलेली सहल आम्हा सगळ्यांनाच आनंद देऊन गेली

No comments:

Post a Comment