BLOG ADDA

Sunday, December 19, 2010

नियतीचे खेळ


“ प्रियांका … “ मागून हाक आली तशी प्रियांकाने मागे वळून पहिले. रोहित धावत धावत तिच्याकडे येत होता. इतकी आर्त हाक तिने रोहित च्या तोंडून कधीच ऐकली नव्हती. रोहित जवळ येईपर्यंत तिच्या जीवात जीव नव्हता. त्या मागच कारण ही तितकच विशेष होत. आज रोहित त्याच्या आईशी प्रियांका आणि त्याच्या लग्ना बद्दल बोलणी करणार होता. धावून धावून थकलेल्या रोहितला श्वास देखील अपुरा पडत होता. प्रियांका पाशी पोहोचल्यावर तिला त्याच्या श्वासांचाआ आवाज स्पष्ट ऐकू येत होत. प्रियांका ने त्याला आपल्या बॅग मधे ठेवलेल्या बाटलीतील पाणी दिले. वाळवंटात फिरताना पाण्याचा ओहोल दिसावा तसा रोहित ते पाणी घटाघट प्यायला. थोडा दम घेत तो सांगू लागला. त्याच्या चेहृयावरचे स्मित सगळे काही सांगत होते. फक्त ते त्याच्या तोंडू ऐकायचे तेवढे बाकी होते. तो म्हणाला , “ आपण जिंकलो प्रियूआपण जिंक्लो.. आईने होकार दिलाय!” हे ऐकले आणि प्रियानकाने आनंदाने प्रफुल्लित झाली. नकळत तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहीले. इतक्या वर्षात आजवर तिला एवढा आनंद कधीच झाला नसेल! ती खुश होतीतिला रोहित बरोबर उभ राहून नाचायच होत.. त्याला मिठीत घ्यायच होत. पण ती आता काय उभी राहणार

20 जून 2008, तिच्या आयुष्यातला असन्ख्य घडामोडींचा दिवस. त्या दिवशी सकाळीच तिला रोहित ने येऊन कॉलेज मधे प्रथम आल्याची बातमी दिली होती. रोहित देखील चांगले गुण कमावून उत्तिर्न झाला होत. आज चा हा दिवस साजरा करायचा असे ठरवून दोघे घराबाहेर पडले. आधी एक नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट पाहून मग दुपारचे जेवण बाहेरच करायचे असे त्यानी ठरवले. ठरल्याप्रमाणे त्यानी चित्रपट पहिला वा ते जवळच्या एका चांगल्या रेस्टोरेंट मधे पोहोचले. तिथे भरपेट जेवून नंतर आइस क्रीम ओर्डर करून ते गप्पा मरत बसले होते. रेस्टोरेंट अगदी रस्त्याच्या बाजूलाच लागून असल्यानेरस्त्यावर येणारी जाणारी माणसे अगदी सहज दिसत होती. बोलता बोलता सहज ती दोघे बाहेरून येणार्‍या - जाणार्‍या लोकाना पाहत होती. काही वृद्धा माणसेकाही प्रेमात प्रेमात पडलेली तरुण तरुणीकाही लहान मुले आपल्या आई – बाबांसोबत फिरत होती.

अचानक प्रियांका चे लक्ष एका लहानग्या कडे गेले. तो जेमतेम 5 वर्षांचा असावा. त्याची आई त्याच्या करिता खेळण्यातली गाडी घेण्यासाठी एका दुकानात शिरली होतीपण बहुदा याने तिचा हात सोडला असावा. कारण तो त्या दुकानच्या बाहेर उभ्या असलेल्या स्पाइडर-मॅन चे त शर्ट विकणार्‍या फेरीवल्याकडे पाहत होत. अचानकपणे त्या फेरीवल्याने रस्ता ओलांडायला सुरूवात केली. त्याचे या मुला कडे लक्ष देखील नव्हते. मंत्रमुग्धा असल्यासारखा तो लहानगा त्याच्या मागे मागे जाउ लागला. दुपारची 3-4 ची वेळासल्याने रस्ता फारसा गजबजलेला नव्हताआणि गाड्यांची ये – जा देखील जास्त नव्हती. . इतका वेळ एक गोंडस लहानगा म्हणून त्याच्याकडे पाहणार्‍या प्रियांकाला तो एकटा रस्ता ओलांडताना दिसताचती तडकन उठली. रोहित ला काही समजायच्या आत च ती रस्त्यावर जाऊन पोहोचली. तिने आजूबाजूला पाहिलेनशिबाने कुठली ही गाडी त्यावेळी तिथून जात नव्हती हे पाहून तिने सुस्कारा सोडला. ती त्या छोटू पर्यंत पोहोचत च होती,तितक्यात त्या मुख्य रस्त्याला येऊन मिळणार्या एका हमरसत्यावरून भर्दाव वेगाने एक ट्रक आलात्याने ट्रक ची चाके मुख्य रस्त्याकडे वळवली . प्रियांका गडबदलीतिने धावत जाऊन त्या लहानग्याला जोरात धक्का दिला. तो शेजारच्या फूटपाथ वर जाऊन पडला. पण इथे मात्र काही भलतेच घडले होते. नियतीने प्रियांकाची ची सत्वपरीक्षा घेतली होती.

ज्या जागी तो छोटा उभा होतात्या जागी प्रियांका आल्यानेदुर्दैवाने तिचा एक पाय ट्रक च्या चाका खाली आला होता. प्रियांका ची शुद्ध हरपली. हे सगळे व्हायला जेमतेम 2मिनिटे लागली असतीलतोच रोहित तिथे येऊन पोहोचला! त्याला काय करावे तेच समाजेना. प्रियांकला त्या अवस्थेत पाहून तो मॅटकन खालीच बसला. शेवटी आजू बाजूला जमलेल्या लोकानि प्रियांका ला उचलून टॅक्सी मधे झोपावले. आणि रोहित वारोबर 2माणसे पाठवून तिला हॉस्पिटल मधे पोहोचवण्याची व्यवस्था केली. पण ज्याची भीती होतीते तर केव्हाच घडले होते. प्रियांका ने आपला एक पाय गमावला होता. ती उभ्या आयुष्यात कधीच आपल्या पायावर उभी राहू शकणार नव्हती. रोहित ला मात्र आता पश्चाताप करायची वेळ आली होती. इतक्या कमी वेळेत इतके मोठे अघटित घडेल असे त्याने स्वप्नात देखील पाहिले नव्हते.

जवळ जवळ 1 महिन्यानंतर प्रियांका घरी आली. तिला व्हील चेर वर पाहून तिच्या आईचा जीव तीळ तीळ तुटत होता. इतकी हुशार आणि दिसायला लाखात एक असलेली तिची मुलगी आज उभा राहण्यासाठी दुसर्‍याचा आधार घेतेयहे त्या माऊलीला कसे बरे पहावेल. पण कंठाशी दाटून पण कंठाशी दाटून आलेला हुंदका तिने तसाच गिळला. आणि हसत मुखाने प्रियांकाचे स्वागत करून तिला मायेने जवळ घेतले.
हळू हळू प्रियांका ला व्हील चेअर ची सवय होऊ लागली. काही दिवसातच तिने स्वताची कामे स्वतः करायला सुरुवात केली होती. अर्थातस्वतामुळे दुसर्यांना झालेला त्रास तिला कधीच पाहवला नव्हता. एव्हाना रोहित देखील थोडा सावरला होता. तो अगदी नेहमी तिला भेटायला येत असे. तिला फेरफटका मारायला घेऊन जात असे. तेवढाच प्रियांकाला मोकळ्या वातावरणात फिरायला मिले. आणि रोहितला पश्चाताप करण्याची संधी. प्रियांका हे सगळे जाणून होती. त्या दिवशी ठरल्याप्रमाणे रोहित स्वताचून आपल्याला बाहेर घेऊन आला आणि हे सगळे अनर्थक घडले याची रोहितल ला पूर्ण जाणीव होतीहे प्रियांकाला काळात होते. पण तिच्या लेखी रोहित ची काहीच चूक नव्हती. हे रोहित ला शंभरदा समजावून सांगितलेतरीही तो मात्र ऐकायला तयार नव्हता!

पण आता मात्र त्यांच्या प्रेमाचा संपूर्ण विजय झाला होता. दोघांच्या हि घरून बिनविरोध होकार आला होता. लग्नाची जय्यत तयारी सुरु झाली. लग्नाचा बसताभांडी कुंडीआहेर या सगळ्याची खरेदी सुरु झाली. प्रियांका ने अगदी तिच्या आवडी निवडी नुसार छान रेखीव दागिने बनवून घेतले . लग्नाच्या आदल्या दिवशी साखरपुडा होणार होता. साखरपुड्याची अंगठी घेणे मात्र अजून दोघांचे हि राहिले होते. लग्न अवघ्या ५ दिवसांवर येऊन ठेपल्यामुले लवकरात लवकर अंगठ्या विकत घेणे जरुरी होते. लागलीच मंगळवारी सोनाराकडे जाण्याचा दोघांचा बेत ठरला. रोहित प्रियांकाला तिच्या घरून आणायला येऊन मग ते दोघे पुढच्या कामांसाठी बाहेर पडणार होते. सकाळी ११ वाजता रोहित प्रियांकाच्या घरी पोहोचला. तिथे थोडे कांदेपोहे व चहा घेऊन ते दोघ घराबाहेर पडले.

सोनाराकडे जाऊन त्यांनी अंगठी खरेदीला सुरुवात केली. बर्याच शोधानंतर प्रियांकाने एक हिरेजडीत अंगठी पसंत केली आणि एका छानश्या मजबूत बांधणीच्या सुवर्ण अंगठीने रोहितचे लक्ष वेधून घेतले. प्रियांकाची अंगठी मिळायला अजून २ दिवस लागणार असल्याने फक्त रोहितची अंगठी घेऊन ते दोघ दुकानाबाहेर पडली. जेवणाची वेळ झाली असल्याने बाहेरच कुठेतरी हॉटेल मध्ये जेवायचा बेत ठरला. कुबड्यांच्या आधाराने चालत असताना होणारा त्रास प्रियांका च्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पण त्याला त्या दोघांचा हि नाईलाज होता. एका दुकानापाशी येताच प्रियांका ने तिला तहान लागल्याचे रोहित ला सांगितले. लागलीच रोहित दुकानात पाण्याची बाटली आणण्यासाठी गेला. प्रियांका खुश होती. अंगठी पसंत केल्याचे आईला कळवण्यासाठी म्हणून तिने हातातली पर्स उघडून त्यातून मोबाइल काढला. तसा अचानक कुटून तरी एक मनुष्य धावत येऊन तिच्या हातातून तो मोबाइल फोन हिसकावून पळून जाऊ लागला. एव्हाना रोहित पाण्याची बाटली घेऊन आला होता. कुबड्या धरून त्या व्यक्तीचा प्रतिकार करणे प्रियांकासाठी अशक्य होते,हे रोहित ला माहित होते. त्याने चटकन प्रियांकाच्या हाती पाण्याची बाटली व पिशव्या देतत्या चोराच्या मागे धाव घेतली. एका चौकातून दुसर्या चौकात असे ते दोघे धावत होते. रोहित जीवाच्या आकांताने त्या चोराच्या मागे पळत होता. पण तो चोर बऱ्याच वेगाने पळत होता. त्याच्या मागे पाळता पाळता अचानक रोहित चा पाय एका चौकातल्या खड्यात अडकला. आणि तो धपकन जमिनीवर आडवा झाला. हे हि कदाचित थोडे म्हणूनतिथून येणाऱ्या एका वेगवान मोटारीची धडक रोहित ला बसली. आणि यावर कहर म्हणजे ती त्याच्या उजव्या पायाच्या हाडांचा अक्षरशः चक्काचूर करून गेली. बराच वेळ झाला झाला तरी रोहित आला कसा नाहीम्हणून त्याला शोधात शोधात प्रियांका रिक्षाने चौकात आली. इथे तिला रोहित पडलेला दिसला. "प्रियांका प्रियांका.." असे म्हणत च रोहित ने शुद्ध हरपली. त्याला जाग आली ती हॉस्पिटलच्या बेड वर! इअवाने पुन्हा एकदा खळे मांडला. फक्त या वेळी खेळाडू कुणीतरी वेगळा होता. रोहित ने डोळे उघडताच प्रियांका ने त्याचा हात हातात घेतला. रोहित ला प्रथम काय झाले ते कळेना. पण जस जसा तो आणखी शुद्धीवर येऊ लागलातास तसा त्याच्या उजव्या पायातून येणारी कळ आणखीच जाणवू लागली. त्याला तो प्रसंग पुन्हा आठवू लागला. शेवटी अगदी शेवटचा प्रसंग आठवतच त्याने जोरात किंकाळी फोडली. प्रियांका ने त्याचा हात अजून च घटत दाबला. त्याला धीर देत हळू हळू ती बोलू लागली, " रोहितसावर स्वताला. माझ्याकडे पहामी आहे न तुझ्या सोबतीला. मी तुला कधीच या वेदनेची जाणीव होऊ देणार नाही! ". यावर रोहित म्हणाला, "प्रियुआग तुझ्या दुखत तुझी साथ देण्याचा मी निर्णय घेतला होता. मी तसा पूर्ण प्रयत्न देखील कराल आलो. पण आता! मी तुला आता काय ग आधार देणार प्रियु! जिथे माझा आधारच नाहीसा झालायतिथे मी तुला कसा ग सांभाळणार??"प्रियांका रोहित कडे पाहून हसली व म्हणाली, "अरे वेड्या आता तू मला किवा मी तुला आधार देण्यापेक्षाआपण दोघांनीही एकमेकांची काळजी घ्यायला हवीतसं वचनच दिले आहे आपण एकमेकांना.. आयुष्यात शेवटपर्यंत आपण ते पाळायचे आहे. हो न?" . रोहित किंचित हसल्यासारखा वाटला. दोघेही एकमेकांकडे पाहून अश्रू गाळू लागले. प्रियांकाच्या हाताची रोहित च्या हाताला घातलेली पकड आणखी मजबूत होती गेली.

1 comment: